जखमा
तू चाललेल्या वाटेत फक्त काटे आहेत,
माझ्या हृदयाकडे बघ,जखमा आहेत त्यात!
माझे हृदय हे एक तळघर आहे,
त्यात एक आत्मा फडफडतोय!
तुला देण्यासाठी माझ्याकडे काहीच उरले नाही,
मी आधीच त्यावर सर्वकाही खर्च केले आहे!
या तळहातांमध्ये तू तुझे हृदय ठेवले आहेस,पण पेनाच्या डागाशिवाय त्यात काहीच नाही आहे !तुला प्रेम हवे आहे,वेडेपणा नाही.प्रेम शोधायला आलीस तरी का?
त्या विहिरीतून पाण्याच्या आशेवर बसली आहेस,पण संपूर्ण जमीन नापीक आहे त्यात!माझ्या छातीवर हात ठेव,ऐक!धडधडणाऱ्या दगडाशिवाय त्यात काहीच नाही आहे !तू माझ्याशी जोडलीस तर उजाड होशील,ज्या हृदयात नुसती थडगी आहे,त्या हृदयात यावेच कशाला?

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा