चहा
तुझ्या शिवाय दिवसाची सुरवात होत नाही
काय तुझ्यात जादू आहे कळत नाही
जिथे जाईल तिथे असतो तुला मान
आस्वाद तुझा घेताच दूर होतो ताण
गरीबाची झोपडी असो किंवा राजाचा महल
सगळीकडे असते तुझीच चहल पहल
छोटी टपरी असो किंवा असो फाईव्ह स्टार
सगळीकडे महत्तव आहे तुला फार
रूप जरी तुझे असले वेगवेगळे
तरी प्रेत्यकाला वाटतात चांगलेच सगळे
आनंदाचे क्षण वाटतात तुझ्यामुळे भारी
तुझ्यासॊबत जोडीला असते नेहमी खारी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा